बाळापूर: – लांबणीवर गेलेला मान्सून येत 25 रोजी राज्यात पावसाला सुरुवात होणार असून असून १५ जुलै पर्यंत पेरण्या शेतकरी बंधूंनी करून घ्याव्यात. असे वक्तव्य वाडेगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कार्यक्रमात हवामान तज्ञ पंजाबवर डख यांनी शेतकऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते.
हवामान तज्ञ पंजाब डख हे हवामानाचा अचूक अंदाच देवून शेतकऱ्यांना सतर्क करण्याचे काम करतात. आज ते वाडेगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समीती येथे त्यांचा शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.
यावेळी बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समीती चे अध्यक्ष सेवकराम ताथोड. पातूर कृषी उत्पन्न बाजार समीती चे अध्यक्ष अरूण कचाले. तसेच संचालक संदीप पाटील. रविद्र पाटील सरप. रमेश ठाकरे. मुरुमकार. सर्व संचालक मंडळ उपस्थीत होते. व्याळा सरपंच गजानन वजीरे. सचिव नावकार. तसेच. परिसरातील पदाधीकारी. प्रतिष्ठीत नागरीक. शेतकरी मोठया संख्येने उपस्थीत होते.