बाळापुर( प्रतिनिधी)- येथून जवळ असलेल्या पारस फाटा स्थित भिकूनखेड शेत शिवारातून राष्ट्रीय महामार्ग आहे महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी लागणाऱ्या जमिनी स्थानिक महसूल विभागाकडून संपादित करण्यात आल्या परंतु शासनाने संपादित केलेल्या शेत शिवारातील महामार्ग लागून शेत मालकांनी व्यवसाय करण्याकरिता अतिक्रम करून इतर शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असण्याची तक्रार जीयाज अहमद नासिर अहमद यांनी संबंधित विभागाला करून सुद्धा प्रशासन हेतू पुरेस्पर पणे डोळे बंद करत आहे.
मुझे भिकूनखेड शिवारातील शेत सर्वे नंबर ७/१/क मधून महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले डांबरीकरणापासून काही अंतरापर्यंत शासनाने जमीन अधिग्रहण केले आहे परंतु येथील अब्रार हुसेन यांनी महामार्गालगत अतिक्रम करून आपले व्यवसाय थाटलेआहे परंतु ह्या हॉटेलच्या जागेतूनच इतर शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता आहे हॉटेलचे अतिक्रमण करून अब्रार हुसेन यांनी सदर रहदारीचा शेत रस्ता बंद केल्यामुळे इतर शेतकऱ्यांना आपल्या शेताची कामे करण्यासाठी जाणे येणे होत नसल्यामुळे त्यांच्या शेती पडीत पडण्याच्या मार्गावर आहे व आज रोजी पेरलेल्या शेतामध्ये चौपदरीकरणात केलेल्या कामामुळे नाल्या न काढल्याने किंवा संरक्षण कंपाऊंड भिंत नसल्यामुळे संपूर्ण शेत पाण्याने वाहून गेले आहे संबंधित प्रकरणाची तक्रार जीयाज अहमद यांनी स्थानिक प्रशासना सह संबंधित विभागाला करून सुद्धा संबंधित विभागाने अपघात कोणतीही दखल घेतलेली नाही शिवाय त्या ठिकाणी चौकशी करण्या साठी साधे फिरकले सुद्धा नाहीत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे हाच यश प्रश्न त्यांना भेळसावीत आहे.
अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा न्याय मिळत नसेल तर शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात संबंधित विभागाचे वेळीच दखल घेऊन संबंधित अतिक्रमन त्वरित हटवावे आमरण उपोषण करण्याचा इशारा नियाज अहमद यांनी दिला आहे.