बाळापूर – सुधीर कांबेकर
भारतीय जनता पार्टी बाळापूर, शहरच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्य भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर , खासदार अनुप धोञे , भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील , जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे , जिल्हा सरचिटणीस माधव मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.तसेच अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन सिध्देश्वर हनुमान मंदीर येथे माजी नगर परिषद उपाध्यक्ष किशोरचंद्र गुजराथी यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले होते.
यावेळी महिला आघाडी अध्यक्ष मानकर व महिला आघाडी सचिव नेहा शाह यांनी समाजामधील महिल्यांनी हस्तकला व विनकाम व झाडु टोपले बनविणाऱ्या महिलांचा शहर भाजपचा वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपा जेष्ठ नेते शामराव शेलार, बाबुजी शर्मा , बंडु यादगिरे, महेंद्रसिंह ठाकुर , शहरध्यक्ष शिवम कानकुब्ज उर्फ बंटी महाराज , डाँ रुपेश शाह , प्रितेश गुजराथी, विवेक शेगोकार , निर्भयसिंह ठाकुर , अजय पदमने , योगेश ठाकुर , चेंतन्य अंबाडे , गोलु पठाण , सुरेश गोलाईत , अमोल अहीर , नारायण भुरेवाले , वैभव भारसाकळे , वनिता गोखले , सुनंदा भारसाकळे यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते महीला आघाडी यावेळी उपस्थीत होते.