बाळापूर – दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अन्यायकारक घर टॅक्स विरोधात बाळापुर शहर कडी कडकडीत बंद ठेवण्यात आले. अन्यायकारक घर टॅक्स विरोधात सोमवारी बाळापूर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बंदचे आव्हान केले होते रविवारी रात्री सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रतिष्ठान यांना भेट देऊन शहरात 100% बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत बाळापुर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
अन्यायकारक विरोधात शहर बंद केले असून दुपारी एक वाजे नंतर शहरातून सर्वपक्षीय मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून जास्तीचा आकाराला गेलेला घर टॅक्स कमी करण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी बाळापूर शहर वाशियांकडून करण्यात आली आहे.
बाळापूर शहरात घरे व दुकान अशी मिळून एकूण 11000 च्या जवळपास मालमत्ता आहे आणि या घरांवर अव्वाच्या सव्वा कर लावून कर आकारणी केल्या गेल्याची ओरड बाळापुर शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे त्यामुळे करवाडी विरोधात सर्व पक्षांच्या वतीने बाळापुर शहरातील सर्व दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवून नगरपरिषद वर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे.
त्यामुळे या मोर्चा संदर्भात बाळापुर शहरातील कॉटन मार्केट मध्ये शनिवार रोजी रात्री सात वाजता सर्व पक्षी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला लोकप्रिय आमदार नितीनजी देशमुख तथा माझी आमदार खतीब साहेब, जमीर सेठ, गजानन पूरी महाराज, किशोर सेठ गुजराथी, डाॅ. फय्याज अन्सारी, उमेश अप्पा भुसारी, बाबुजी शर्मा, गुलाब उमाडे, भुषण गुजराथी, आदी पदाधिकारी तथा प्रतीष्ठीत नागरीक उपस्थित होते.
शासन निर्णय दिनांक 2 मार्च 2023 नुसार नगर विकास विभाग कर आकारणी कार्यपद्धतीनुसार करण्यात आली असून महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 119 भूखंड धारकांना चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन प्रति वर्ष कर आकारणी सुधारित करण्यात आलेल्या च्या नोटिसा देण्यात आल्या आहेत मात्र ही कर वाढवायच्या सव्वा झाल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे त्यामुळे करवाडी विरोधात सोमवारी बाळापूर शहरातील सर्व दुकान दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवून नगरपरिषद वर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे.