खामगाव येथील गुरुद्वारा येथे गुरू सिंघ सभा यांचे वतीने बाल विर दिवस साजरा करण्यात आला. या वर्षी पासून 26 डिसेंम्बर हा बाल विर दिवस केंद्र शासनाने घोषित केले आहे
या दिवसाचे महत्व शहारा आणणारे आहे.
गुरू गोविंदसिंहजी महाराज यांचे पुत्र फतेहसिंघ व जोरावरसिंघ यांनी राष्ट्र, धर्म व समाजाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती त्या वेळी फतेहसिंघ यांचे वय 6 वर्ष तर जोरावरसिंघ यांचे वय 8 वर्ष होते. एव्हढेच नाही तर गुरू महाराजांच्या संपूर्ण परिवाराने 21 दिसेम्बर ते 28 दिसेम्बर दरम्यान राष्ट्र, धर्म व समाजाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. दरवर्षी शीख बांधव विर बाल दिवस विविध उपक्रमाद्वारे व मोठ्या आदराने साजरा करणतात