Friday, October 18, 2024
Homeराज्यसार्वजनिक शिवजयंती महोत्सव वाशिम द्वारा आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत बाल विकास मंदिर...

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव वाशिम द्वारा आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत बाल विकास मंदिर प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव येथील तहसील कार्यालयाजवळ बोरगाव रोडवरील श्री व्यंकटेश सेवा समिती वाशिम द्वारा संचालित बालविकास मंदिर प्राथमिक शाळा मालेगाव येथील विद्यार्थिनी कु.ईश्वरी रामेश्वर इढोळे आणि सृष्टी रामकृष्ण गायकवाड यांनी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव वाशिम द्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

सदर प्रश्नमंजुषा पेपर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये घेण्यात आला.यामध्ये जवळपास सर्व शाळांनी सहभाग घेतला होता.छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रश्नांचा समावेश यामध्ये होता. या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवून संस्थेचे तसेच शाळेचे नाव उज्वल केले आहे.

या विद्यार्थ्यांना सार्वजनिक शिवजयंती महोत्सव वाशिम यांच्याद्वारे राजुभाऊ चौधरी, नारायणराव काळबांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: