Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनसांस्कृतिक कलादर्पणचा बाळ धुरी व उषा नाईक यांना सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार...

सांस्कृतिक कलादर्पणचा बाळ धुरी व उषा नाईक यांना सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार…

मुंबई – गणेश तळेकर

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक कलादर्पणच्या वतीने दरवर्षी चित्रपट, रंगभूमी या कलाक्षेत्रातील मान्यवरांचा विविध पुरस्कारांने गौरव करण्यात येतो. २०२४ च्या याच संस्थेच्या ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा’साठी अभिनेता बाळ धुरी व उषा नाईक यांना एका भव्य मनोरंजन सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्याचे आयोजन मे महिन्यात होणार आहे.

बाळ धुरी व उषा नाईक हे तब्बल पाच दशके मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवला असून त्याचे विशेष कौतुक करण्यासाठी व त्यांच्या चौफेर कामाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.असे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे आणि सचिव सुनील खेडेकर यांनी कळवले आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: