मूर्तीजापुर तालुक्यातील मुरंबा येथील गावातील गजानन आत्माराम वैरागडे यांनी मुरुंबा येथील ग्रामसेवक यांना विचारले की माझे घरकुल का आले नाही या कारणावरून ग्रामसेवक यांना त्यांची कॉलर धरून गजानन वैरागडे यांनी मारहाण केली व ग्रामसेवक यांच्या कडील असलेली शासकीय रमाई घरकुलाची यादी फाडली व त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान चे कलम ३५३, ३३२, ५०६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला व आरोपीस अटक करून दी. १५/०१/२०२३ रोजी न्यायालया समक्ष पेश केले.
त्यानंतर आरोपीने विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन मिळणे करिता अर्ज दाखल केला सदर जामीन अर्जास पोलिसांनी कडाडून विरोध केला व न्यायालयामध्ये कथन केले की सदरचा गुन्हा हा तपासावर आहे व आरोपीस जर न्यायालयाने जामीन दिली तर तो तपासात बाधा निर्माण करू शकतो व साक्षीदारांवर दबाव आणू शकतो व त्यामुळे सदर केसच्या निकालावर परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे पोलिसांनी न्यायालयात असे कथन केले की आरोपी परत ग्रामसेवक यांच्याशी भांडण करू शकतो व त्यामुळे एखादा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आरोपीची जामीन झाल्यावर तो तपासात सहकार्य करणार नाही व साक्षदारांवर दबाव टाकून त्यांना धाकदपट करू शकतो त्यामुळे आरोपीचा जामीन नाकारण्यात यावा.
आरोपीच्या वतीने न्यायालयात अॅड. सचिन वानखडे यांनी युक्तीवादा दरम्यान न्यायालयात सांगितले की आरोपी हा एक सज्जन व्यक्ती असून त्याने कुठलाही गुन्हा केलेला नाही त्याचप्रमाणे त्याच्याविरुद्ध खोटा रिपोर्ट दिलेला असून त्याला जाणून-बजून अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फसवण्यात आलेले आहे.
आरोपीने केलेले कृत्य हे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये बसत नसून त्याच्याविरुद्ध प्रथम दर्शनी गुन्हा सिद्ध होत नाही त्याचप्रमाणे आरोपीच्या जामिनाकरिता अनेक महत्त्वाच्या बाबींकडे सुद्धा न्यायालयाचे लक्ष त्यांनी वेधले.न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपीस दि.२०/०१/२०२३ रोजी जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने न्यायालया समक्ष अॅड. सचिन वानखडे यांनी युक्तिवाद केला.