Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingबागेश्वर बाबांनी तोडले अकलेचे तारे...तुकाराम महाराजांबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य...काय म्हणाले?

बागेश्वर बाबांनी तोडले अकलेचे तारे…तुकाराम महाराजांबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य…काय म्हणाले?

नागपुरातून श्याम मानव यांच्या आव्हानांना घाबरून पळ काढणारे बागेश्वर बाबा आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा केल्यात, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बागेश्वर बाबा काय म्हणाले?
“संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.

त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय….”

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: