बदलापूर येथील लहान बालिकेवर झालेल्या अत्याचारविरोधात आज मौदा तालुक्यातील महिलांद्वारे निषेध मोर्चा काढत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
रामटेक – राजू कापसे
बदलापूर येथील लहान बालिकेवर झालेल्या अत्याचारविरोधात आज मौदा तालुक्यातील महिलांद्वारे निषेध मोर्चा काढत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. मौदा तालुक्यातील महिलांनी निषेध मोर्चा करत राज्यपालांना निवेदन देत मागणी केली कि, सदर आरोपीस फाशीची शिक्षा होईल याच पद्धतीने जलदगतीने खटला चालवून नराधमाला फाशी देण्यात यावी.
तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता 12 तास FIR न नोंदविणाऱ्या पोलीस अधिकार्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच सदर घटनेत गृह यंत्रणा हि सपशेल कुचकामी ठरली असून , महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश बघता मा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
यावेळी अनेक महिलांनी 1500 रुपये परत घ्या पण मुलीबाळी महिलांना संरक्षण द्या अश्या भावना व्यक्त केल्या.. यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्या भारतीताई गोडबोले,महिला संघटिका निताताई पोटफोडे, नीलिमा घरजाळे, वर्षा पडोळे,ममता कानफाडे, प्रतिमा ठाकरे, चंदाताई ठाकरे,अर्चना सातपुते, वंदना हिवसे, उज्वला सुखदेवे, गीता शेबे, पुष्पा गाडबैल,विद्या गोडबोले, कविता वडे, योगिता हटवार, विद्या वडे, आशा गोडबोले, अल्का गोडबोले, मैनाबाई कडू,संगीता गोडबोले, बेबीबाई वडे, सुशीला गोरले, शांताबाई कातुरे, वनिता भोयर,
निर्मला सावरकर, कुंता वक्कलकर, कल्पना राऊत, शुभांगी राऊत, सुरेखा राऊत, चंद्रकला करंडे, अरुणा कुकडे, सुनीता घरजाळे, वंदना फुले, माया राऊत, शालू कुथे, रोशनि घोटाकडे, सुरेखा ठुभरे, दुर्गा लांजेवार, लता जुमले, अभिलाषा गजभिये, निर्मला हिंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले उमेश भोतमांगे, दिगंबर बांगडकर, नंदकिशोर चाभारे,
अनिल धावडे, बंडू म्हहले, श्रीराम हटवार, रवींद्र निकाळजे, मुकेश यादव मंगेश वाघमारे, मनशा पटेल , रोहित वाघमारे, राजेश बावनकुळे, अक्षय पंछबुढे, सचिन वंजारी, अंकुश कडू,शुभम वानखेडे,लोकेश मुंमणेनी,विनोद डहाके,चंद्रभान शेबे,संजय कडवं, चंद्रशेखर ढोणे, राजेश पडोळे, बंटी हटवार, संजय मेहर, अनिकेत झोड व शेकोडे महिला व शिवसैनिक उपस्थित होत्या…