- नागरिकांच्या जीवाला धोखा.
- अपघात होण्याची दाट शक्यता.
- खड्डे दिसू नये म्हणून खड्यांनवर ठेवल्या बोरी.
- जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण.
- एच.जी कंपनीचे निकृष्ट काम.
नरखेड – अतुल दंढारे
काटोल ते वरूड मार्गाचे मागच्या एक वर्षा पूर्वी सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट एच.जी इन्फ्रा कंपनी ला देण्यात आला असून या कंपनीने दोन वर्षात या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले असून पाच वर्ष या रस्त्याचे देख भाल करण्याची जबाबदारी सुद्धा या कंपनीची आहे. काटोल ते वरूड महामार्गावर जलालखेडा येथील नाल्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाच फुटाचे गड्डे पडले असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
त्या खड्ड्यात पाळदळ चालणारा व्यक्ती त्या खड्याय पडण्याची दात शक्यता आहे. इतक्या खोल खड्या त पडल्यास जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हे पडलेले खड्डे लपण्यासाठी त्या खड्यावर मातीने भरलेली बोरी ठेवण्यात आली. या खड्यावरून एखादे वाहन कीवां एकदा व्यक्ती गेल्यास तो सरळ त्या खड्ड्यात जाऊन पडेल. अशा प्रकारचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या एच.जी कंपनी ने केले असून या कंपनीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी गावकरी करत आहे.
असे निकृष्ट काम करणाऱ्या कंपनीवर शासनाने बंदी आणावी अशी सुद्धा मागणी होत आहे. एखाद्याचा जीव गेल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहे. लवकरात लवकर रस्त्याच्या दोन्ही बाजूने पडलेले खड्डे बुजवण्यात यावे अशी मांगनी केली जात आहे.