Monday, December 23, 2024
Homeराजकीयबच्चू कडूंचा प्रहार - शेतीचे लिलाव रोखले जिल्हा बँकेवर धडक देत आंदोलन,...

बच्चू कडूंचा प्रहार – शेतीचे लिलाव रोखले जिल्हा बँकेवर धडक देत आंदोलन, हातपाय तोडण्याचाही इशारा…

अमोल साबळे

थकीत कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याची प्रक्रिया नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू केली आहे. मंगळवारी असाच लिलाव होत असताना प्रहारचे आ. बच्चू कडू समर्थकांसह जिल्हा बँकेत धडकले. जर बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला, तर बँक व्यवस्थापनाला धडा शिकवू शिवाय लिलावात जमिनी खरेदी करणाऱ्यांचे हातपाय तोडू, असा इशारा आ. कडू यांनी दिला. यानंतर बँकेच्या प्रशासकाकडून लिलाव रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्यासाठी जिल्हा बँकेने सुमारे ३०० शेतकऱ्यांना नोटीस जारी केल्या आहेत. मंगळवारी १९ पेक्षा जास्त थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव बँकेने ठेवला होता. आ. कडू दुपारी समर्थकांसह बँकेत पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्यास कद्रादन विरोध करीत.

आधी १३० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा

थोड्या कर्जासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्यापेक्षा २००३ मध्ये जिल्हा बँकेत झालेल्या १३० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी आणि आ. सुनील केदार यांच्या या घोटाळ्यातील सहभागासंदर्भात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी कडू यांनी केली. या आंदोलनातून कडू केदारांना चौकशीत आणतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

लिलाव प्रक्रिया उधळून लावली. यानंतरही लिलाव करण्यात आला तर प्रहार स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा दिला. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली जाईल. त्यानंतर कर्ज प्रकरण आणि लिलावसंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बँकेचे कार्यकारी अधिकारी चितरंजन नाईक यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: