आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद संपुष्टात येण्याचे चिन्ह काही दिसत नसून यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते, आता त्याच सभास्थळी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी “मैं झुकेगा नही’चे बॅनर” लावल्याने हा वाद आता मिटणार नसल्याचे दिसते. तर आमदार रवी राणा हे शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांना हनुमान चालीसा प्रकरणात शरण आले नाही, तुरूंगात जाणे पसंत केले मात्र झुकले नाहीत. तर आता बच्चू कडू यांची साठी माघार घेतल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात बरेच दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. बच्चू कडूंनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता. या आरोपानंतर ‘राणा विरुद्ध कडू’ असा संघर्ष निर्माण झाला. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू हे माझ्या एका फोन ने गुवाहाटी ले गेले होते हे सांगितल्याने लोकांना धक्काच बसला होता, रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांचे खास निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळेच रवी राणांकडून वादावर पडदा टाकण्यात आला असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
रवी राणांनी आरोप मागे घेतल्यानंतर तुमच्यातील वाद संपला का? असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “नाही, अजून वाद संपला नाही. आमच्या संस्थापक सदस्यांशी मी उद्या चर्चा करणार आहे. आम्ही सर्व मुद्दे लिहून घेतले आहेत. उद्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा करून ते जिल्हा प्रमुखांसमोर मांडणार आहोत. त्यानंतर पुढे काय करायचं? हा निर्णय घेतला जाईल. सध्या तीन भूमिका समोर येत आहे. त्यामध्ये तटस्थ राहायचं, सत्तेत राहायचं की बाहेर पडून पाठिंबा द्यायचा, अशा तीन भूमिका समोर येत आहेत. चर्चेअंती जास्त गणित ज्या भूमिकेवर जुळून येईल, त्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाईल” असं बच्चू कडू म्हणाले.
मात्र बच्चू कडू यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने त्यात सभासाठी पोस्टर लावून रवी राणा यांना इशाराच देण्यात आला असल्याचे दिसत आहे, त्यामुळे बच्चू कडू हे वेगळीच भूमिका घेणार की काय? ते आज स्पष्ट होईल.