देशात ‘बाबा’ मोठ्या प्रमाणात उदयास येत असून दररोज नवीन बाबांचे प्रकार समाज माध्यमातून पाहायला मिळत आहे. तुमच्यापैकी बहुतेकांनी आत्तापर्यंत अनेक बाबा पाहिले असतील. ज्यामध्ये असे अनेक बाबा आहेत, ज्यांच्या पराक्रमाने आपल्याला आश्चर्य वाटते. काही एका पायावर उभे राहून अनेक वर्षे तपश्चर्या करत आहेत, तर काहींनी कधीही केस कापत नाहीत. काही झुल्याला टांगलेले आहेत तर काही सोन्याचे दागिने लदलेले आहेत. अशा सर्व बाबांबद्दल तुम्ही आजवर ऐकले आणि पाहिले असेल. आता या यादीत एक नवा बाबा सामील झाला आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बाबा जळत्या चुलीवर बसून आपल्या भक्तांना आशीर्वाद देताना दिसत आहे.
व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत, कारण त्यात बाबा एका लांब लोखंडी तवा चुलीवर ठेवून आणि खाली आग जळत आहे. पण, बाबा आगीला जुमानत नाहीत. त्याच्या आजूबाजूलाही अनेक लोक दिसतात. अनेक भाविक त्यांचे आशीर्वाद घेताना दिसतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बाबा धोतर घातलेल्या आणि बिडी ओढणाऱ्या लोकांशी बोलत आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि अनेक लोक त्यांना भेटायला येत आहेत.
@Liberal_India1 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. काहींच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ अकोल्यातील आहे. मात्र अजून याची पुष्टी झाली नसल्याने अनेक जन संभ्रमात आहेत. तर काहींच्या मते भाषा हि अकोला,अमरावती या जिल्ह्यातील असल्याचे टिप्पणी विभागात म्हटले आहे.