Sunday, January 5, 2025
Homeराज्यबाबा बलविंदरसिंघ महाराज यांचा राष्ट्रीय सेवारत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मान...

बाबा बलविंदरसिंघ महाराज यांचा राष्ट्रीय सेवारत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मान…

नांदेड – महेंद्र गायकवाड

जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा नांदेड येथे अखंड लंगर सेवा देऊन उल्लेखनीय काम क करीत असल्याबद्दल संत बाबा बलविंदर सिंग महाराज यांचा शांतिदूत परिवाराच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय सेवा रत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन शांतिदूत परिवार व क आयएएस अकादमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर व स्पर्धा मार्गदर्शन शिबिरामध्ये मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज नांदेड येथे आयोजित कार्यक्रमांमध्येपोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,

विधी सेवा प्राधिकरण सचिव दलजितकौर यांच्या अध्यक्षतेखाली व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष सूर्यतळ , डॉ. तेजस माळवतकर , बापू दासरी , अश्विन जाधव, पोलीस निरीक्षक नितीन काशीकर ,प्राचार्य डॉ. डी.बी देशमुख, डॉ. अनंत सूर्यवंशी, कृष्णा घोडजकर, राज गोडबोले, शेख नईम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लंगर साहेब गुरुद्वारा नांदेड चे जथेदार संत बाबा बलविंदरसिंग यांचा राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात हा पुरस्कार बाबा बलविंदरसिंग यांचे प्रतिनिधी बाबा सूबेकसिंग यांनी स्वीकार केला.

बाबा बलविंदरसिंग यांचे रवींद्रसिंग मोदी ,प्रितपालसिंग शाहू, जगदीपसिंग नंबरदार, राजेंद्रसिंग पुजारी, रणजीतसिंग गिल, मनप्रितसिंग कुंजीवाले, हरभजनसिंग दिघवा यांच्यासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: