गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले
ओद्योगिक सुरक्षा( शून्य अपघात) सप्ताह निमित्त उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या वतीने वाहन धारक, प्रवाशी, कंपनी कामगार यांना वाहतूक नियमांचे पालन व घ्यावयाची दक्षता या बाबत प्रबोधन व जनजागृती करण्यात आली. यावेळी सपोनि चंद्रकांत शेडगे यांनी वाहन चालकांना अपघात समयी घ्यावयाची काळजी, प्रथोउपचार या विषयी मार्गदर्शन केले.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील उजळाईवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अप्पर पोलीस महासंचालक सारंगल, पुणे प्रादेशिक विभाग पोलीस अधीक्षक श्रीमती लता फंड, पोलीस उपअधीक्षक राजन सस्ते, पोलीस निरीक्षक प्रीती शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सपोनि चंद्रकांत शेडगे, सपोनि कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र नुल्ले, शंकर कोळी, ,म हा मार्ग पोलीस कर्मचारी , महामार्ग मृत्युंजय दुत मोहन सातपुते, डॉ राजेंद्र सूर्यवंशी, महादेव वाघमोडे, युवा ग्रामीण विकास संस्था स्थलांतरीत कामगार लक्ष्य गट हस्तक्षेप प्रकल्प गोकुळ शिरगाव येथील कर्मचारी आदी उपस्थित होते.
फोटो ओळ: शून्य अपघात सप्ताह निमित्त महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी माहिती पत्रिकाव्दारे प्रबोधन व जनजागृती करण्यात आली. तसेच कंपनीमध्ये ही कार्यशाळा घेऊन कामगार यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी केंद्राचे सपोनि चंद्रकांत शेडगे, सपोनि कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, पोलीस निरीक्षक रवींद्र नुल्ले, महामार्ग मृत्युंजय दुत मोहन सातपुते आदी.