जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियानाचे उदघाटन महिला व बाल कल्याण विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या हस्ते 16 सप्टेंबर रोजी 11 वाजता घेण्यात आला. इ .5वी तील विद्यार्थीनी वैष्णवी कुमावत हिने गाण्यावर डान्स करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी कृषी अधिकारी प्रतिक्षा सोनवणे, तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, सरपंच गोविंद पवार, म्हसावद रुग्णालयाचे डॉ.सागर नाशीककर
प्रकल्प अधिकारी कोकिळा भोई ग्रा.प. सदस्य शितल चिंचोरे पंचायत समितीचे माजी उपसभापती संगिता चिंचोरे विधी सेवा सहायक्क भारती कुमावत ग्रामसेवक मुरलीधर उशीर केंद्रप्रमुख कैलास पवार उपप्राचार्य जी. डी . बच्छाव पर्यवेक्षक एस. के. भंगाळे सागर इंगळे,
सीमा रॉय, एश्वर्या मंत्री,अंगणवाडी सेविका, मदतनीस थेपडे विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस .जे. पवार सर यांनी केले. या कार्यक्रमात देवेंद्र राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये पोषण आहाराचे महत्व बाबत त्यांनी आपले मनोगत सांगीतले या अभियानात अंगणवाडी सेविका, मदतनिस, बचतगट यांच्या द्वारे विविध प्रकारचे खेळणी, खादय पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.
(पत्रकार – श्री.लखन कुमावत महा.व्हाईस जळगाव ग्रामीण अध्यक्ष – सिंधुताई बहुउद्देशीय संस्था म्हसावद )