मुर्तिजापूर – हातगाव ग्रामपंचायत अनु. जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास योजनेअंतर्गत दिलेल्या धनादेशाबाबत खुलासा तत्कालीन गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस यांनी धनादेश क्र. ०८२४०४ दिनांक ४ जानेवारी २०२२अन्वये अन्वर बिल्डर्स मटेरीयल सप्लायर यांना तत्कालीन गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस व ग्रामविकास अधिकारी मयत मदन येवले व इतरांनीही परस्पर लाखो रुपये काढून पैश्याची विल्हेवाट लावली.
असे दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी पंचायत विभाग जिल्हा परिषद अकोला जाक्र/जिप/पच्या/स्था -९/४५/२३ च्या सहप्त्र -: चौकशी अहवाल जाक्र/पसमु/लेखा/०५००९/२०२३ कार्यालय पंचायत समिती मुर्तिजापूर २१ डिसेंबर २०२३ पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायत हातगाव यांना कामनिहाय वितरीत केलेला निधीच्या नोंदीची तपासणी केली असता व त्याची सविस्तर कामनिहाय खर्चाची स्थिती दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ ची शिल्लक (ग्राम पंचायत. रोखपुस्तकांनुसार) रू १२४,४८८.३१ दिनांक २४ मार्च २०२१ रोजी ग्रां. प. ने. वितरीत निधिमधील शिल्लक १०२,०००,०० बँक खाते मध्ये प्राप्त व्याज रू १२,२९०० एकून जमा २,२७,६५९.२६ दिनांक ३१ मार्च २०२१ची शिल्लक रक्कम. दि. ३१ मार्च २०२१ रोजी शिल्लक असलेल्या रकमेमधून तत्कालीन सचिव मयत मदन येवले व तत्कालीन गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस यांच्या संयुक्त सहीने दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी धनादेश क्र. ८२४०४ अन्वये . अन्वर बिल्डर्स यांना रुपये २,२५०००/ चा धनादेश अदा केल्याचे निदर्शनास आले आहे.
आदेश क्र. जाक्र/पस/पंचायत/ग्रासे अस्था -२/५७५/२३ दिनांक १७ मार्च २०२३ अन्वये तत्कालीन सचिव मयत मदन शामराव येवले ग्रा. वि. अ. यांचे अंतिम नादेय प्रमाण पत्रामध्ये रू २,२५०००/- वसुली बाबत कार्यवाही करण्यात आली आहे. असे नमूद आहे.
परंतु तक्रारदार . सुरेश जोगळे माजी सैनिक तथा जिल्हाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती व स्वतंत्र भारत पक्ष यांना गेल्या दोन वर्षांपासून टोलवा टोलवी चे उत्तर देण्यात आली. विद्यमान गटविकास अधिकारी व चोकशी समिती यांनी थातुरमातुर अहवाल सादर केले व दिशाभुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अद्याप योग्य निर्णय, न्याय मिळाला नाही. जो पर्यंत अपहार प्रकरणातील दोषी वर कार्यवाही करण्यात येत नाही तो पर्यंत ही लढाई तत्कालीन गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस व इतर चोकशी अंती दोषी वर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती,तक्रार विभागीय आयुक्त अमरावती येथे करण्यात येणार जरुरत पडल्यास न्यायालयीन लढाई लढल्या जाणार ,अपहार प्रकरणातील दोषी वर कार्यवाही करण्यात यावी करीता प्रयत्न केले जात आहे. शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती व स्वतंत्र भारत पक्ष सुरेश जोगळे यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.