आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७,०२७ युनिट्सची विक्री
न्युज डेस्क – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७,०२७ युनिट्सची विक्री केली आहे, ज्यामध्ये एकूण ३३ टक्के वाढ झाली आहे. ब्रॅण्डने २०२४ च्या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रामुख्याने पुरवठा साखळीमध्ये अडथळे असताना देखील विक्रीसंदर्भात आव्हानांचा सामना करत १,०४६ युनिट्सची विक्री केली आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ”आम्हाला वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमुळे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३३ टक्क्यांची प्रबळ वाढ दिसण्यात आली आहे. आमच्या उत्पादन पोर्टफोलिओला प्रबळ मागणी मिळत आहे, जेथे आम्ही पुरवठ्यासंदर्भातील आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज आहोत. २०२३ मधील विक्रमी विक्रीच्या आधारावर लक्झरी बाजारपेठेत सुरू असलेल्या विकासासह आम्हाला २०२४ मध्ये ५०,००० कार्सच्या विक्रीचा टप्पा पार करण्याच्या उद्योगाच्या क्षमतेबाबत विश्वास आहे.”
ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस पूर्व-मालकीच्या कार व्यवसायाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ५० टक्क्यांची वाढ केली. जानेवारी ते मार्च २०२४ कालावधीदरम्यान ऑडी अप्रूव्ह्ड: प्लसने २५ टक्यांच्या प्रबळ वाढीची नोंद केली. सध्या देशभरातील सर्व प्रमुख ठिकाणी २६ ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस सुविधांसह कार्यरत असलेला ब्रॅण्ड विस्तार करत राहिल आणि यंदा चार अधिक पूर्व-मालकीच्या कार सुविधांची भर करेल.
ऑडी इंडिया उत्पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी क्यू५, ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू८, ऑडी क्यू८ ५० ई-ट्रॉन, ऑडी क्यू८ ५५ ई-ट्रॉन, ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन, ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.