विविध चार्जिंग स्टेशन्ससाठी एक-थांबा अॅप्लीकेशन
ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज ‘मायऑडीकनेक्ट’ अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’च्या लाँचची घोषणा केली. हे विशेषत: ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांसाठी अॅपवरील विविध चार्जिंग स्टेशन्ससाठी एक-थांबा अॅप्लीकेशन आहे. चार्ज माय ऑडी हा इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम आहे, जो इलेक्ट्रिक वाहन मालकांच्या सोयीसुविधेवर लक्ष केंद्रित करतो.
सध्या अॅप्लीकेशनमध्ये पाच चार्जिंग सहयोगींचा समावेश आहे: आर्गो ईव्ही स्मार्ट, चार्ज झोन, रिलक्स इलेक्ट्रिक, लायनचार्ज आणि झिऑन चार्जिंग, जे न्यूमोसिटी टेक्नॉलॉजीज ईएमएसपी रोमिंग सोल्यूशनद्वारे समर्थित आहेत.
चार्ज माय ऑडी ग्राहकांना कार्यक्षमपणे त्यांच्या ड्राइव्ह मार्गाचे नियेाजन करण्याची, मार्गातील चार्जिंग स्टेशन्सची माहिती मिळवण्याची, चार्जिंग टर्मिनल्सची उपलब्धता तपासण्याची, चार्जिंग सुरू करण्याची व थांबवण्याची, तसेच सिंगल पेमेंट गेटवेच्या माध्यमातून सेवेसाठी देय भरण्याची सुविधा देते.
सध्या ‘चार्जमाय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी ७५० हून अधिक चार्ज पॉइण्ट्स उपलब्ध आहे आणि पुढील काही आठवड्यांमध्ये व महिन्यांमध्ये अधिक चार्ज पॉइण्ट्सची भर करण्यात येणार आहे.
फोक्सवॅगन ग्रुप सेल्स इंडियाचे कार्यकारी संचालक व बोर्ड सदस्य श्री. ख्रिस्तियन कॅन वॉनसीलेन म्हणाले, ‘‘ग्रुप म्हणून आम्ही इलेक्ट्रिक गतीशीलतेप्रती कटिबद्ध आहोत आणि सतत इलेक्ट्रिक वाहनांचे मूल्यांकन करत आहोत व चार्जिंग इकोसिस्टम विकसित करत आहोत. लक्झरी इलेक्ट्रिक विभागात उत्तम मागणी दिसण्यात येत आहे आणि ग्राहकांसाठी यासारखे उपक्रम मालकीहक्क अनुभवासंदर्भात व्यवहार्यता अधिक प्रबळ करत आहेत.’’
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘‘ऑडी इंडिया ग्राहक केंद्रित्वावर लक्ष केंद्रित करते. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सतत मूल्यांकन करण्यासोबत सोल्यूशन्स सादर करत आहोत, ज्यामुळे मालकीहक्क अनुभव त्रास-मुक्त होतो.
‘चार्जमायऑडी’ अद्वितीय, इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम आहे, ज्याचा ग्राहकांना सोयीसुविधा देण्याचा मनसुबा आहे. आम्ही भारतात ई-ट्रॉन लाँच केल्यापासून इलेक्ट्रिक गतीशीलतेप्रती परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वसमावेशक इकोसिस्टम निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.’’
चार्ज माय ऑडी विविध अॅप्लीकेशन्स डाऊनलोड करण्याचा त्रास दूर करते. ऑडी ई-ट्रॉन ग्राहक ‘मायऑडीकनेक्टअॅप’चा वापर करत चार्जिंग प्रक्रिया सुरू करू शकतात, तसेच त्याचवेळी ऑटोमेटेड आयडेण्टिफिकेशन व बिलिंग प्रक्रिया सुरू होईल.