मूर्तिजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच क्रीडा संघटक अतुल इंगळे यांची भारतीय बॉल बॅडमिंटन महासंघाच्या सहसचिव पदी निवड झाल्याने शहरातील क्रीडा प्रेमी, कार्यकर्त्यांकडून त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अतुल इंगळे क्रीडा क्षेत्रात अमूल्य योगदान आहे. तालुक्यातील एखादा क्रीडा संघटक देशाच्या कार्यकारणीत जावा हे तालुक्यातील लोकांसाठी अभिमानस्पद बाब आहे. त्यांच्या निवडीने जिल्ह्यातील अनेक तरुणांना बॉल बॅडमिंटन सारख्या खेळात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
अतुल इंगळे यांचा प्रवास
अतुल इंगळे मागील ३० वर्षा पासून क्रीडा क्षेत्रा मध्ये कार्यरत असून विविध संघटना वर् कार्यरत आहेत. बॉल बॅडमिंटन चे राष्ट्रीय खेळाडू आहेत. मूर्तिजापूर सारखा तालुका स्थरावरुन् महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिशन चा संपूर्ण राज्याचा कारभार चालवीला जातो. प्रथमच तालुका स्तरावर श्री अतुल इंगळे यांना.राज्य महासचिव प्राप्त झाले.
मूर्तिजापूर येथे अनेक राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजन अतुल इंगळे यांनी केले आहे.मूर्तिजापूर येथे प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा अतुल इंगळे यांनी मार्च २०२३ मध्ये आयोजीत केला देश भरातील अनेक राज्य संघानी सहभाग नोंदवीला होता. अतुल इंगळे यांची राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदे वर नियुक्ती केली होती. हा मान मूर्तिजापूर तालुकाला प्रथमच प्राप्त झाला होता.
भिलाई येथे दी १५ ओक्टोम्बर येथे भारतीय बॉल बॅडमिंटन महासंघ निवडणुकी मध्ये श्री अतुल इंगळे यांना सहसचिव पद प्राप्त झाले त्यांनी आपला पदासह महाराष्ट्र संघटने ला तीन पदे प्राप्त करून दिली.
मूर्तिजापूर शहराला प्रथमच मान मिळाला आहे. बॉल बॅडमिंटन महासंघाचा ६८ वर्षाचा इतिहासा मध्ये महाराष्ट्र राज्यला प्रथमच तीन पदे प्राप्त झाली. अतुल इंगळे हे मुर्तिजापूर शहरातील व्यावसाहिक असून आपला व्यवसाय सांभाळून क्रीडा सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.