Monday, December 23, 2024
Homeराज्यपोस्ट विभागामार्फत रक्षाबंधनासाठी ‘आकर्षक राखी लिफाफे’...

पोस्ट विभागामार्फत रक्षाबंधनासाठी ‘आकर्षक राखी लिफाफे’…

अमरावती – दुर्वास रोकडे

रक्षाबंधन अगदी जवळ येत असताना, प्रत्येक बहिणीचे प्रेम तिच्या भावापर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचावे यासाठी पोस्ट विभागामार्फत आकर्षक व वॉटरप्रूफ राखी लिफाफे उपलब्ध करुन दिले आहे. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक डिझानमध्ये तयार केलेले केवळ 12 रुपयामध्ये उपलब्ध करुन दिले असून त्यांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन पोस्ट विभागाव्दारे करण्यात आले आहे.

देशभरात राख्यांचे सुरक्षित आणि वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी हे लिफाफे विशेषतः तयार केलेले आहेत. हे लिफाफे केवळ आकर्षकच नाहीत तर आतील मौल्यवान राखीला उत्कृष्ट संरक्षण देखील देतात. उच्च गुणवत्तेच्या सामग्रीसह बनविलेले लिफाफे जलरोधक आहेत. जे आपल्या राखीच्या गंतव्यस्थानावर सुरक्षितपणे पोहोचण्याची हमी देतात. राखी लिफाफे पील-ऑफ स्ट्रिप सील यंत्रणेसह येतात, ज्यामुळे ते बंद करणे आणि सुरक्षित करणे सोपे होते.

सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विविध प्रकारचे लिफाफे आकर्षक डिझानमध्ये तयार केलेले आहेत आणि त्यांची किंमत रु. 12/- सेवा करासह उपलब्ध आहे. पोस्ट विभागाने राखी डिलिव्हरी प्रक्रिया जलद करण्यासाठी विशेष व्यवस्था सुट्टीच्या दिवशी देखील केली आहे. ग्राहक त्यांच्या राख्यांच्या जलद वितरणासाठी स्पीड पोस्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

या वर्षी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देशात, विदेशात राखी पाठवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राखी पाठवण्यासाठी पाकिटावर “राखी पोस्ट” असा उल्लेख करावा. तसेच योग्य पिन कोड वापरणे आवश्यक राहिल. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: