Saturday, December 21, 2024
Homeराज्यकृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न फसला..!

कृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न फसला..!

पातुर तालुका कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पातूर – निशांत गवई

पातूर शासनाकडून शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कृषी औषध मोफत वाटप केला जातोय, मात्र पातुर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोफत कृषी औषध पासून वंचित ठेवून, औषध मोठ्या शेतकऱ्यांना विक्री केली जाते.

लाखो रुपयांची मुदत संपलेल्या कृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार चान्नी पिंपळखुटा मार्गावरील सोनाटी नाल्याजवळ चांगेफळ शेतशिवारात शनिवारी १४ डिसेंबर रोजीच्या सकाळी उघडकीस आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे खत मिळणे, खतांच्या योग्य प्रमाणात वापर होणे, पिकांची वाढ होणे, सेंद्रिय आणि रासायनिक खतांच्या संतुलित वापर करणे, यासाठी शासन वेळोवेळी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत कृषी औषध वाटपाची मोहीम राबवते, परंतु पातुर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोफत कृषी औषध वाटप केली जात नसून,

ती औषध मोठ्या प्रमाणात मोठ्या शेतकऱ्यांना विक्री केली जाते, त्यामुळे मुदत संपलेल्या लाखो रुपयांची कृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याकडे संबंधित कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन लाखो रुपयांची कृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे.

कृषी विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
पातुर तालुका कृषी विभागाचा गेल्या काही महिन्यापासून अनागोंदी कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी दिलेली कृषी औषध साठ्यांची माहिती ठेवण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी यांची असते, मात्र तालुका कृषी अधिकारी यांच्या बेजबाबदार व दुर्लक्ष कारभारामुळे लाखो रुपयांचा कृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आल्याने कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुदत संपलेल्या औषधांचा साठा उघड्यावर
शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी मिळालेली कृषी औषध शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली नाही, औषधांची मुदत संपल्याने प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीपोटी लाखो रुपयांचा मुदत संपलेल्या कृषी औषध साठ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी औषध साठ्यांचा खच्च चान्नी पिंपळखुटा मार्गावरील सोनाटी नाल्याजवळ एका शेतात उघड्यावर लावारिस टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार रोजी सकाळी उघडकीस आला आहे. यावर काय कारवाई होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: