त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार बिप्लब कुमार देब यांच्या त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथील वडिलोपार्जित घराबाहेर मंगळवारी रात्री उशिरा अज्ञात जमावाने हल्ला केला. जमावाने पुजाऱ्यांनाही लक्ष्य केले. यादरम्यान हल्लेखोरांनी वाहनांची तोडफोडही केली.
देब यांच्या घरी यज्ञ करण्यासाठी पुजारी आले होते
उदयपूरच्या जामजुरी भागातील राजनगर येथे पुजार्यांचा एक गट देब यांच्या घरी पोहोचला तेव्हा ही घटना घडली. बुधवारी देब यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या घरी यज्ञ करण्यासाठी पुजारी आले होते. वृत्तानुसार, हल्लेखोरांनी पुजाऱ्यांवर हल्ला केला आणि वाहनांची तोडफोड केली. आजूबाजूच्या लोकांनी आणि स्थानिक लोकांनी पुजाऱ्यांची सुटका केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
स्थानिकांनी या घटनेचा निषेध करण्यास सुरुवात केली. लोकांनी हल्लेखोरांच्या दुकानांची तोडफोड करीत आग लावली. यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी निरुपम देबबर्मा आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक देबांजना रॉय घटनास्थळी पोहोचले. पुण्यतिथीच्या एक दिवस आधी माजी मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर झालेला हल्ला हा सीपीएमचा कट असल्याचे सांगण्यात येत आहे. काक्राबनचे आमदार रतन चक्रवर्ती यांनी मंगळवारी हल्लेखोरांसोबत बैठक घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
सीपीएमवर संशय बळावला
नुकसान झालेले वाहन मालक जितेंद्र कौशिक यांनी सांगितले की, मी त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या दर्शनासाठी आलो होतो. बुधवारी होणाऱ्या यज्ञाची तयारी पाहण्यासाठी मी माझ्या गुरुदेवांच्या सूचनेनुसार येथे आलो होतो. अचानक एक जमाव आला, त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या वाहनाची तोडफोड केली.
हल्लेखोरांच्या दुकानांचीही तोडफोड करण्यात आली
स्थानिकांनी या घटनेचा निषेध करण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी हल्लेखोरांच्या दुकानांची तोडफोड केली. यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी निरुपम देबबर्मा आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक देबांजना रॉय घटनास्थळी पोहोचले.