Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतू जनतेला समर्पित करणार आहेत. यासोबतच ते नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार असून 30,500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत.
हजारो कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला अटल सेतू मुंबईला नवी मुंबईशी जोडणार आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारताच्या विकासाचे नवे उदाहरण असतानाच हा पूल देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी नवी जीवनरेखा ठरणार आहे. एका अंदाजानुसार, दररोज सुमारे 70 हजार लोक या पुलावरून प्रवास करतील. येथे 400 कॅमेरे बसवण्यात आले आहेत, याशिवाय ट्रॅफिक प्रेशरची माहिती गोळा करण्यासाठी AI आधारित सेन्सर बसवले आहेत.
अटल सेतूची वैशिष्ट्ये
अटल सेतू 21.8 किमी लांब आहे
17,840 कोटी रुपये खर्चून ते तयार करण्यात आले आहे
डिसेंबर 2016 मध्ये पायाभरणी झाली
16.5 किमी समुद्रावर आणि 5.5 किमी जमिनीवर बांधले आहे.
🌉 Atal Setu: India’s Longest Sea Bridge !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 10, 2024
Bridging the waters, uniting the city, and standing tall in engineering brilliance.#AtalSetu #NarendraModi #Maharashtra #engineering pic.twitter.com/QHg4iQmfWU
युवा दिनानिमित्त पंतप्रधान एक लाख तरुणांना संबोधित करणार आहेत
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युवा दिनानिमित्त एक लाखाहून अधिक तरुणांना संबोधित करतील. स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभनगरीमध्ये देशभरातील तरुणांचा मेळा आयोजित केला जाईल, ज्याचे प्रमुख पाहुणे पीएम मोदी असतील. कार्यक्रमाची थीम तरुणांसाठी, तरुणांनी ठेवली आहे. सर्व तरुण येथे जमतील आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची शपथ घेतील. केंद्रीय मंत्री म्हणाले, पंतप्रधानांना थेट ऐकण्यासाठी एक लाखाहून अधिक तरुण असतील, तर देशातील सर्व जिल्ह्यातील तरुण थेट कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांचे म्हणणे ऐकतील.