मूर्तिजापूर – विलास सावळे
मूर्तिजापूर अमृतवाडी योग भवन येथे भारतरत्न स्व. मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला.
अटल फाउंडेशन च्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती अपर्णा सिंह त्रिपाठी, राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल कुलथिया यांनी सुचित केल्याप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या मार्गदर्शनात नवनिर्वाचित अटल फाउंडेशन विदर्भ विस्तारक विष्णू लोडम यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा नेत्या तथा समाजसेविका सौ नूतन हरीश पिंपळे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुनीता लोडम, मा. नगराध्यक्ष मोनाली गावंडे, समाजसेविका रूपाली तिडके डॉ. स्वाती पोटे समाजसेवक कमलाकर गावंडे कविता साखरे सोनल बांगड रजनी भिंगारे साहेबराव बांबल ज्ञानेश्वर भडगुरुजी हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न स्व. मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली व उपस्थित मान्यवरांनी स्व मा पं.अटलजी बिहारी यांच्या जीवनावर आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले यानंतर विठ्ठल रुक्माई महिला मंडळ चे संस्थापक स्व. ह भ प किसन महाराज गणेश गुरुजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने साधना कातखेडे प्रीती जयस्वाल प्रकाश भिंगारे साहेबराव बांबल अतुल गावंडे गोपाल गावंडे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विठ्ठल रुक्माई महिला मंडळ व हॅपी वुमन्स क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले