अटल दौड च्या कार्यालयाचे उदघाटन आ प्रवीणभाऊ पोटे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. अटल दौड संपूर्ण राज्यात नावरूपाला आली असून अमरावती शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळणार आहे.
सगळे धाव पटू सहभागी होतील. या वेळी या स्पर्धेचे आयोजक तुषारभारतीय यांनी अटलदौड कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून खेळ जगतात नवीन चैतन्य आणल्या शिवाय राहणार नाही.राज्यातील अव्वल धावपटू भाग घेत असून शहराला त्यांची ओळख होऊन अनेक धावपटू तयार होतील.
या वेळी दीप प्रज्वलन करून कार्यालयाचे भूमिपूजन केले.या वेळी वेगवेगळ्या समितीची निर्मिती करण्यात आली असून मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते तयारीला लागले असून नोंदणी करीत महाविद्यालय शाळा वेगवेगळया क्रीडा अकादमी ला संपर्काची जबाबदारी दिली आहे.
या कर्यक्रमाचं संचालन बादल कुळकर्णी तर आभार प्रणित सोनी यांनी केले.या कार्यक्रमाचा रूपरेषा श्री चेतन गावंडे आणि प्रशांत शेगोकार करीत असून त्यांचा अंतर्गत एक समिती तयार केली आहे. या वेळी ऑन लाईन तसेच कार्यालयात नोंदणी करणाऱ्यानी गर्दी केली. नोंदणी साठी www.ataldaud.com