मूर्तिजापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारीसाठी आटा कम फकीर ज्यादा अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे तर या मतदारसंघात भावी उमेदवारी संख्या 18 च्या वर गेल्याने पक्ष कोणाला तिकीट देणार? असा प्रश्न पक्षासमोर ठाकला आहे. एकाला तिकीट दिलं तर 17 त्याच्या विरोधात जाणार असल्याची कुणकुण पक्षाला लागली आहे. याचं ताजं उदाहरण नुकत्याच सम्राट डोंगरदिवे यांनी घेतलेल्या कार्यक्रमादरम्यान समोर आलय. सम्राट डोंगरदिवे यांचा कार्यक्रम पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना फेल पाडायचा होता. जयंत पाटील जेव्हा शहरात दाखल झाले, त्यानंतर तब्बल दोन, तीन तासानंतर सभास्थळी पोहोचले जयंत पाटील हे सभास्थळी वेळेवर पोहोचू नये यासाठी जयंत पाटलाचे वेगवेगळे कार्यक्रम शहरात राबवले गेले. त्यामुळे सम्राट डोंगरदिवे यांच्या कार्यक्रमात मोठा उशीर झाला होता. जास्त उशीर झाल्याने पब्लिक कंटाळून सभास्थळावरून निघून जाण्यासाठी यांनी हा प्रयोग केला होता. मात्र त्यांचा हा प्रयोग फसल्याने सम्राट डोंगरदिवे यांची सभा जंगी झाल्याचं दिसतेय. अशी जंगी सभा आजपर्यंत शहरात कोणत्याही मोठ्या नेत्याची झाली नसल्याचे बोलले जाते. या सभेमुळे सम्राट डोंगरदिवे यांचे नाव अवघ्या मतदारसंघात झालं आहे. मात्र शहरातील काही फुकट खाऊ नेते व एका पार्सलच्या मार्फत दोन-चार उपाशी पत्रकारांना हाताशी धरून सम्राट यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात बातम्या करायला लावल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. तरी मात्र सम्राट यांचा लोकप्रियतेचा ग्राफ हा कमी व्हायचं नाव घेत नाहीये. तो वाढतच असल्याने काही भावी उमेदवारांनी या निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. निभाव लागत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी हात आवरता घेतल्याचे समजते. तर आम्ही तुझ्याच नावाची शिफारस करू असे सांगून एका पार्सलला लुटण्याचे काम काही संधी साधू नेते करीत आहे.
अगोदर काँग्रेसच्या ताब्यात असलेला मूर्तिजापूर मतदारसंघ हा मूळचा राष्ट्रवादीचा नसून या मतदारसंघात आता फक्त दोनच पक्षाची चालते ते म्हणजे एक भाजप आणि दुसरा वंचित तरी पण राष्ट्रवादीच्या या पक्षात एवढी गर्दी का? जी किमया तुकाराम भाऊने केली होती ती किमया आताच्या भावी उमेदवारांमध्ये आहे का? या मतदारसंघाचा ब्रँड पक्ष नाही तुकाराम बिडकर ब्रँड होता. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने इंट्री घेताच निवडणूक जिंकली या निवडणुकीत तुकाराम बिडकर यांनी बाजी मारत अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाज फेल पाडले. तुकाराम भाऊ जेव्हा या मतदारसंघात दाखल झाले तेव्हा अनेक राष्ट्रवादीच्या काही फुकट्या नेत्यांनी त्यांना खूप छळले तरीपण ते निवडून आले. हा या पक्षात भेदभाव आतापासूनच नाही तर अनेक वर्षांपासून येथे दुसरा कोणी चालत नाही. तेव्हा पण काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते निवडून न येण्यासाठी जीवाचा आटापिटा केला होता. मात्र तुकाराम भाऊ तोपर्यंत खूप पुढे निघून गेले होते. तुकाराम भाऊ निवडून आले आणि ५ वर्षात मतदारसंघाचा कायापालट केला. तुकाराम भाऊ जाता जाता बरीच कामे केलीत, यांची उरलेली अर्धवट कामे आपल्याच पक्षातील आमदारांचे हस्ते व्हावीत अशी त्यांची इच्छा होती मात्र गेल्या १५ वर्षांपासून भाजपचा आमदार असल्याने त्यांचे अर्धवट कामेही पूर्ण झाली नाहीत आणि मतदार संघाचा विकासही झाला नाही. तर यावेळेस याच पक्षातील एक भावी उमेदवार निवडून येऊ शकतो मात्र त्याला बदनाम करण्याची पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सुपारी घेतली आहे.
शहरासाठी किंवा मतदार संघासाठी कवडीचे हे योगदान नसलेले नेते स्वतःला शरद पवार पेक्षाही मोठे समजू लागले आणि शरद पवार गटात आपली चालते त्यामुळे आपण ज्याला म्हणू त्याला शरद पवार तिकीट देणार अशी पक्षात प्रतिमा तयार केली आहे. सम्राट डोंगरदिवे हा बौद्ध समाजाचा असल्याने यांनी मतदारसंघात कोणी मतदान करणार नाही अशी भ्रामक अफवा या नेत्याचे चमचे पसरवीत आहे. म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातील एक पार्सल उमेदवार आपल्या हौशीसाठी मतदार संघात मागवण्यात आला, त्याची पैशाची अतोनात लूट करून त्याला तिकिटाच्या आश्वासन दिले. या पार्सलची निवडून येण्याची कुवत नसून याला ४ हजाराच्यावर मतदान मिळणार नसल्याचे याच नेत्याचे काही पदाधिकारी सांगतात.
राष्ट्रवादी (श.प.) चे सर्वेसर्वा शरद पवार द्रष्टे नेते आहेत. राष्ट्रीय राजकारणात वजन असणाऱ्या शरद पवारांची स्वतंत्र यंत्रणा सगळेच निकष तपासते. ते स्वतः निर्णय घेतात. जयंत पाटील त्यांचे विश्वासू आहेत. अशा परिस्थितीत कोणी कितीही पार्सले आणले, कोलांटउड्या मारल्या तरी सम्राट डोंगरदिवेंच्या उमेदवारीला धक्का लागू शकत नाही, हा लोकांमधून व्यक्त होणारा विश्वास बोलका असावा.