पातूर – निशांत गवई
मराठी नवं वर्ष आणि संत श्री सिदाजी महाराज यांच्या सप्ताहाचे औचित्य साधून पातूर येथे पाडवा पहाट सुमधुर भक्तीगीत, भावगीतांचा कार्यक्रम पार पडला.
श्री सिदाजी महाराज संस्थान, स्वरसाधना संगीत विद्यालय व किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल यांच्यावतीने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्थानिक सिदाजी महाराज मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या पाडवा पहाट या कार्यक्रमात प्रा. विलास राऊत यांनी दिग्दर्शन केले.
यावेळी आकाश गाडगे, नंदाताई निलखन, अंकिता उगले, श्रेया निलखन, स्वरा गाडगे, गौरव वडकुटे, रुपाली भिंगे, संदीप देऊळगावकर आदी कलावंतांनी सुमधुर भक्तीगीते सादर केली. यावेळी मनोज राऊत, मंगेश राऊत, प्रविण राऊत, अंश अत्तरकार यांनी साथ संगत दिली. त्यानंतर किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी सोनम मेहरे,
शर्वरी दळवी, तेजस्विनी ढोणे, शरयू बगाडे, भार्गवी गणेशे, अन्वी तेजनकर, रिद्धी खुरसडे यांनी सादर केलेल्या नृत्यानें रसिकांना मंत्रमुग्ध केले. संचालन संदीप देऊळगावकर व गोपाल गाडगे यांनी केले.
कार्यक्रमाला पत्रकार देवानंद गहिले, साहित्यिक प्रा. विठोबा गवई, किड्स पॅराडाईज चे संस्थापक गोपाल गाडगे, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, नितु ढोणे, रुपाली पोहरे, शुभम पोहरे, झेपचे अध्यक्ष नंदू ठक, संतोष पाटील, संतोष खंडारे, प्रविण निलखन, प्रा. वसंत गाडगे, निशाताई गाडगे, उमेश काळपांडे, मनोज इंगळे, विलास वडकुटे आदी सह बहुसंख्य उपस्थित होते.