राजु कापसे
रामटेक
काल दिनांक ८ ऑगस्ट रोजी रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तथा मौदा मार्गावरील नगरधन येथे देवचंद शालिकराम बावनकुळे वय ३० वर्ष यांच्या घरी भरदिवसा कुणी नसल्याचे पाहुन नगद, सोने व इतर साहित्य मिळून तब्बल ९१ हजारांच्या मुद्देमालावर हात साफ केला.
फिर्यादी देवचंद शालीकराम बावनकुळे वय ३० वर्षे रा. वार्ड क्रमांक ५ नगरधन हा सुर्यलक्ष्मी कंपणी नगरधन गेला होता व त्याचे आई-वडील ईलेक्टीक बील भरणे असल्याने शेतावर न जाता बील भरण्याकरीता गावात गेले होते. दरम्यान दुपारी १२.३० वा. बिल भरुन घरी परत आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडला दिसला. शंका आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरात सामान अस्तवस्थ पडलेले दिसले व घरातील दोन्ही लोंखडी आलमारी चे दरवाजे उघडे दिसले.
सामानाची व ईतर वस्तुची पाहणी केली असता लोख़डी आलमारी मध्ये लॉकर मध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले नगदी ५०० रु च्या १५४ नोटा एकुण ७७०००/- रु , सोन्याची जुनी गरसोळी ८ ग्रॅम १००००/- रु , ५ तोड्याचे चांदीचे पायपट्टी , ४ तोड्याचे चांदीचे पायपट्टी, १ तोड्याचे चांदीचे जोडवे एकुण १० तोडे प्रत्येकी ४००/- रु प्रमाणे एकुण ४०००/-रु असा एकुण ९१००० /- रु च्या मालावर अज्ञात चोराने हात साफ केला.
घरी कुणी हजर नसताना घराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन घरात आत प्रवेश करुन ही चोरी केल्याचे दिसुन आले. अज्ञात चोराविरुध्द रामटेक पोलिसांनी ४५४,३८० भा.द.वी अन्वये गुन्हा नोंद केलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार हे करत आहेत.