Tuesday, October 22, 2024
Homeराज्यमानेगाव टेक सिमारेषेवर पी.आय. तुरकुंडे यांचा कडक बंदोबस्त...

मानेगाव टेक सिमारेषेवर पी.आय. तुरकुंडे यांचा कडक बंदोबस्त…

पोलिस निरीक्षक तुरकुंडे यांचा राहाणार ‘ वॉच ‘…

विविध पथक चेक पोस्टवर तैनात…

रामटेक – राजु कापसे

रामटेक निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे तेव्हा प्रशासनाने विशेषता राज्याच्या सीमारेषेंवर कडक बंदोबस्त लावलेला आहे.

त्यानुसार राज्याच्या सीमा रेषेलगत असलेल्या देवलापार पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी सुद्धा सीमारेषे जवळील चेक पोस्टवर पोलीस कर्मचारी तैनात करून ते स्वतःही त्यावर वॉच ठेवून आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फ्लाईंग स्कॉड (भरारी पथक), एफएसटी, व्हिडीओ टीम, दारू, रोकड, प्रतिबंधित औषधे यांची सखोल तपासणी. राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध नशीले पदार्थाच्या वाहतुकीसंदर्भात भरारी पथक तत्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

रामटेक विधानसभा क्षेत्रात तीन नाके मानेगाव टेक, अंबाझरी, घोटीटोक येथे तयार करण्यात आले आहेत. या नाक्यांवर स्थिर निगराणी पथक नेमण्यात आले आहे.

आचारसंहितेचा भंग होणार नाही तथा निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये अशा बाबींची तथा अशा वस्तूंची परराज्यातून वाहतूक होऊ नये यासाठी राज्याच्या सीमेरेषेवर पोलीस प्रशासनासह विविध पथकांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

निवडणूक काळामध्ये विशेषता परराज्यातून पैसा वाहतूक , दारू वाहतूक तथा इतर अवैध पदार्थांची छुपी वाहतूक होत असते. परिणामस्वरूप आचारसंहितेचा भंग होत असतो तेव्हा विशेषतः सीमारेषेवर कडक बंदोबस्त लावणे गरजेचे असते.

याबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमारेषेलगत असलेल्या देवलापार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांना मानेगाव टेक सीमेरेषेवर करण्यात आलेल्या बंदोबस्ताबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मानेगाव टेक सीमारेषेवर असलेल्या चेक पोस्ट वर विविध पथकांच्या एक एक कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासनाचे चार कर्मचारी तैनात असुन तेथे कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच स्थानीक पातळीवर माझे सुद्धा चेकपोस्ट वर जाणे येणे असुन तेथील हालचालींवर मी जातीने वॉच ठेवुन असल्याचे पो.नि. नारायण तुरकुंडे यांनी माहिती देतांना सांगितले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: