नायब तहसिलदार मोहन पांडे यांची प्रमुख उपस्थिती…
मुर्तिजापूर – महाराष्ट्र शासन महसूल विभागा अंतर्गत शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियान -२०२३ माननीय जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय मुर्तीजापुर महसूल मंडळ लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान येथे शासन आपल्या दारि या शिबीराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषयक विविध योजनेची माहिती देण्यात आली व आयुष्यमान भारत, आभा कार्ड व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी डिजिटल प्रमाणपत्राचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आले.
यामध्ये जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर , सेंट्रल कास्ट , डोमेशियल , उत्पन्न दाखला , ७-१२ , ८ अ , फेरफार व इतर दाखले व ग्रामपंचायत अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड , आभा कार्ड , जन्म , मुत्यु प्रमाणपत्र विविध प्रमाणपत्राचे वितरण शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना करण्यात आले.
यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहन पांडे सर , मंडळ अधिकारी रामराव जाधव , तलाठी लाखपुरी संदिप बोळे , तलाठी समुद्रे , तलाठी सुधाकर सोनोने , तलाठी वैभव राऊत , तलाठी एस . आर .समुद्रे , तलाठी पी. पी . लांडगे ,तलाठी पी. आर . जोध , रा. पी . वाकोडे , लाखपुरी ग्रा.प. सरपंच राजप्रसाद कैथवास ,
ग्रामविकास अधिकारी गोवर्धन जाधव ,ग्रा.प. सदस्य रामराव देशमुख , कुषी विभागाचे खंडारे साहेब ,पत्रकार गजानन गवई , उमेश जामनिक ,ग्रा.प .कर्मचारी जगदिश सुरजुसे,
लाखपुरी ग्रा.प. लाखपुरी येथील आपले सरकार सेवा केंद्राचे केद्रचालक अतुल नवघरे सह लाखपुरी येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती. कार्यक्रमाचे संचालन अतुल नवघरे यांनी केले तर आभार तलाठी संदिप बोळे यांनी मानले. .