सांगली – ज्योती मोरे
सांगलीतील कुपवाड मधील सिंहजीत प्रतिष्ठान व स्टेप ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील एक हजार महिलांना स्वावलंबी योजनेत स्वयंरोजगारासाठी थेट निधी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती स्टेप ऑफ वूमन चे प्रोजेक्ट इन्चार्ज प्रशांत माने व स्नेहजीत प्रतिष्ठानचे सचिव स्नेहल गवंडाचे यांनी आज सांगलीत झालेल्या पत्रकार बैठकीत दिली आहे.
या उपक्रमांतर्गत महिलांना दहा ते पन्नास हजार रुपयापर्यंत इतकी रक्कम अथवा यंत्र व वस्तुस्वरूपात विनापरतावा थेट निधी उपलब्ध करून दिला जात आहे. हा लाभ घेणाऱ्या महिलांनी किमान दोन वर्षे सदर व्यवसाय करणे अनिवार्य आहे. मदत वितरण समारंभ दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी सांगलीतील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली व रोटरी गव्हर्नर नासिर बरसादवाला,
जायंटस वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश चितळे, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसेयांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्टेप ऑफ वुमन अंड चाइल्ड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे आशिया विभाग प्रमुख सुबोध दप्तरदार, स्नेहजीत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संन्मती गोंडाजे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
या योजनेसाठी डिसेंबर अखेर सुमारे दोन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे यातून महिला आर्थिक सक्षम बनाव्यात असा हेतू आहे स्टेप ऑफ वुमन फाउंडेशन ही संस्था यामध्ये प्रामुख्याने आर्थिक योगदान देणार आहे. स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व या योजनेत नाव नोंदवलेल्या महिलांनी 29 सप्टेंबरला विष्णुदास भावे न�