दानापूर – गोपाल विरघट
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व अठरापगड जातींना सोबत घेऊन सत्तेपासून वंचित असणाऱ्या लहानात लहान समूहाला सत्तेच्या मूळ प्रवाहात आणून प्रस्थापितांच्या डोक्यावर बसवणारे नेते, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील जाणते राजे, कायदे तज्ञ प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा 69 वा वाढदिवस वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडीच्या वतीने बस स्टॅन्ड दानापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी केक कापून व चहा नाश्त्याचे वितरण करण्यात आले व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली करण्यात आली. या उत्सवाला मा. जि. उपाध्यक्ष सुभाष रोंदळे, मा. पं .स.सदस्य श्रीकृष्ण विरघट, मा जि.प. सदस्य श्रीकांत खोने, वाकोडे गुरुजी, भगवान हागे, सरपंच पती धम्मपाल वाकोडे,
ग्रा. पं. उपसरपंच सागर ढगे संदीप कांबळे, संतोष हागे,विजय अढाऊ, गोपाल विरघट, सुनील सुरजुसे, राहुल विरघट, सदानंद खंडेराव, कैलास रोदळे, योगेश नाठे, संजय तायडे, रवी वाकोडे, नागेश वाकोडे, मोहन वाकोडे, गोपाल गवई, तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.