Assembly Election Results : विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, मध्यप्रदेशमध्ये भाजप 130 आणि काँग्रेस 96 जागांवर आघाडीवर आहे, छत्तीसगडमध्ये भाजप 45 आणि काँग्रेस 43 जागांवर आघाडीवर आहे, तेलंगणामध्ये काँग्रेस 66 आणि बीआरएस 43 जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थानमध्ये भाजप 103 जागांवर तर काँग्रेस 86 जागांवर आघाडीवर आहे. आज तेलंगणातील 199, छत्तीसगडच्या 90, मध्य प्रदेशच्या 230 आणि राजस्थानच्या 199 जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. आधी पोस्टल मतपत्रिका मोजण्यात आल्या आणि आता ईव्हीएम मशिनच्या मतांची मोजणी सुरू आहे.
देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीचे ट्रेंडही येऊ लागले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. तर तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तथापि, हे अद्याप प्रारंभिक ट्रेंड आहेत. देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून, त्यासाठी मतमोजणी सुरू आहे. सध्या पहिल्या पोस्टल बॅलेटच्या मतांची मोजणी सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. राजस्थान आणि तेलंगणामध्ये अनुक्रमे २५ आणि ३० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 16 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये संपत आहे, तर मिझोरामचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून, त्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे.