Wednesday, December 25, 2024
Homeराज्यलाडकी बहीन योजनेसाठी विधानसभा समिती गठीत...

लाडकी बहीन योजनेसाठी विधानसभा समिती गठीत…

पारस – सुधीर कांबेकर

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी करिता शासनाच्यावतीने विधानसभा क्षेत्रनिहाय शासकीय समितीचे गठण
करण्यात आले असून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजितकुमार कुंभार यांनी तसे पत्र तहसीलदार बाळापूरयांना पाठविले आहे.

शासन निर्देशानुसार बाळापूर विधानसभा क्षेत्र समितीचे अध्यक्षपदी रमन शांतीलाल जैन यांची तर समितीचे सदस्य म्हणून बाळापूर येथील उमेशआप्पा भुसारी तसेच डोंगरगाव येथील धनंजय नेमाड़े यांची वर्णी लागलीआहे. विधानसभा क्षेत्र समितीमध्ये गटविकास अधिकारी बाळापूर- पातूर, मुख्याधिकारी न.प.बाळापूर- पातूर, बालविकासप्रकल्प अधिकारी बाळापूर- पातूर,सरंक्षण अधिकारी बाळापूर- पातूर हे सदस्य राहणार असून समितीचे सचिव बाळापूर तहसीलदार तर सहसचिव म्हणून पातुरचे तहसीलदार असणार आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: