Thursday, November 21, 2024
Homeराज्यविवरा येथे कुटुंबीयावर प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल : आरोपी फरार...

विवरा येथे कुटुंबीयावर प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल : आरोपी फरार…

पातुर – निशांत गवई

पातूर : १ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा सर्वोच्च रुग्णालय अकोला येथे दाखल झालेल्या सुभाष सोपीनाथ पजई (४५) यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट नुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास गावातील आझाद चौकात त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर घरात घुसून काहींनी हल्ला केला.

पूर्व वैमानश्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे असून एका मारहाण प्रकरणात आपण साक्षीदार असल्याने संगम मत करून त्यांनी हे कृत्य केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे या प्रकरणी चान्नी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर चार मुख्य आरोपी फरार आहेत

विवरा येथील सुभाष सोपीनाथ पजई यांनी चान्नी पोलिसांना दिलेल्या जबाब नुसार, स्वप्नील पजई, प्रफुल्ल कुरई, आकाश झोडपे, आणि सचिन पजई यांनी अचानक त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. त्यांच्या उजव्या व डाव्या पायाला जखमा झाल्या असून तोंड, छाती, आणि डाव्या हातावर मार लागला आहे. हल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रफुल्ल कुरई हा लोखंडी रॉड आणि कोयता घेऊन सुभाष यांच्या घरी गेला त्यांच्या पत्नीला धक्कादायक प्रस्तावला. विरोध केल्यावर त्याने जोरदार हल्ला चढविला यावेळी लोखंडी रोड व कोयत्याने सपासफ वार केले नंतर रॉड ने मारहाण केल्यामुळे त्यांच्या पायाला फॅक्चर झाले त्यांना जबर मारहाण करीत डाव्या हातावर मार लागला आहे.

हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत दरम्यान प्रफुल्ल कुरईची आत्या लता विठ्ठल कुरई यांनी सुभाष यांच्या पत्नीला फरफटत रस्त्यावर आणले, आणि त्यांचे वडील मोहन कुरई यांनी देखील मारहाण केली. गावातील बऱ्याच लोकांनी हे बघितले असले तरी कोणी मदतीला आले नाही. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

सुभाष आणि त्यांच्या पत्नीला त्वरित ग्रामीण रुग्णालयात नेले गेले, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून चान्नी पोलिसांनी तातडीने पावले उचलत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

यापूर्वी झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात हे सर्व मंडळी आरोपी असून त्यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांमध्ये अंतरिम जामीन मंजूर असला तरी आता या प्रकरणामुळे ते पुरते अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

१०ऑक्टोबर ची दखल न घेतल्याने हल्ला

10 ऑक्टोबर रोजी याच आरोपींनी माझ्या घरात घुसून पत्नीला मला व माझ्या अल्पवयीन मुलीला जबर मारहाण केली होती त्या संदर्भात आम्ही 10 ऑक्टोबर रोजी सविस्तर तक्रार चान्नी पोलिसात दिलेली होती त्यावेळी आमचे मेडिकल करण्यात आले मात्र सदर तक्रार आर्थिक देवाण-घेवाण घेऊन चौकशी ठेवण्यात आली त्यानंतर आरोपीचे मनोबल वाढले असून त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा आम्हाला मारहाण केली त्या संदर्भात आम्ही अकोला पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिलेली आहे या सर्व प्रकाराला चान्नी पोलीस जबाबदार आहेत.

सुभाष सोपीनाथ पजई विवरा

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: