संजय आठवले आकोट
घरात झालेल्या कुरबूरीवरुन मोठ्या भावाने सख्खा लहान अंध भाऊ व त्याची अंध पत्नि यांचेवर कोयत्याने प्राणघाती वार केल्याने अंध भाऊ गंभीर जखमी झाला आहे तर त्याची अंध पत्नी जागीच ठार झाली आहे. जखमी अंध भावास अकोला येथे ऊपचारार्थ नेण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर पळून जाण्याच्या बेतात आसलेल्या खून्यास व त्याच्या आईस तेल्हारा पोलीसानी शिताफीने अटक केली आहे. हा प्रकार हिवरखेड येथिल स्वस्तिक कॉलनी भागात घडला या प्रकाराने संपूर्ण हिवरखेड शहरात अंध दांपत्याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
हिवरखेड शहरातील स्वस्तिक कॉलनीत कंडारे कूटूंब राहत आहे. या कूटूंबात आई, एक डोळस तर एक अंध असे दोन भाऊ व त्या अंध भावाची अंध पत्नि असे चार जण आहेत. सुत्रानी दिलेल्या माहितीवरुन या कूटूंबात नेहमी कूरबूर सुरुच राहत असे. अशातच दि. ३० जूलै रोजी मोठा भाऊ हा शेतातून घरी आला असता पाणी आणण्यावरुन बोलचाल झाली. त्यामूळे मोठ्या डोळस भावाचा राग अनावर झाल्याने त्याने आपला सख्खा अंध भाऊ व अंध भावजय यांचेवर कोयत्याने जबर वार केले. हे घाव वर्मी लागल्याने अंध पत्नी जागीच ठार झाली. तर अंध भाऊ गंभीर जखमी झाला.
मृतक अंध महिलेचे नाव सत्यभामा शांताराम कंडारे वय २८ तर अंध भावाचे नाव शांताराम कंडारे वय ३० आहे. घटनेची खबर मिळताच हिवरखेड ठाणेदार विजय चव्हाण हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. ते तेथे येण्यापूर्वीच खूनी भाऊ विनोद कंडारे व त्याची आई हे दोघे घरुन फरार झाले होते. ठाणेदार चव्हाण यानी या फरार व्यक्तींची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याना दिली. त्यावरुन तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड आणि पोलिस राजू ऊर्फ गजानन ईंगळे यानी तेल्हारा बस स्थानकावर शोध घेतला असता सदर खूनी व त्याची आई पळून जाण्याचे बेतात आढळून आली.
या दोघानाही फड व त्यांचे सहका-यानी शिताफीने अटक केली. जखमी शांतारामची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे ऊपचारार्थ पाठविण्यात आले आहे. या दरम्यान उपविभागिय पोलिस अधिकारी रितु खोखर यानी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. पूढिल तपास हिवरखेड ठाणेदार विजय चव्हाण करित आहेत.