Tuesday, November 5, 2024
HomeMarathi News Todayआसामच्या आमदारांनी केली आमदार बच्चू कडूंच्या अटकेची मागणी...प्रकरण काय आहे? ते जाणून...

आसामच्या आमदारांनी केली आमदार बच्चू कडूंच्या अटकेची मागणी…प्रकरण काय आहे? ते जाणून घ्या…

शिंदे गटाशी हातमिळवणी केल्यापासून आमदार बच्चू कडू यांच्यावर एकामागून एक संकट येत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे थेट आसामच्या विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला आहे. बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यावरून केलेल्या वक्तव्याचा आसाममधील आमदारांनी निषेध नोंदवला आहे.

राज्यात सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बच्चू कडू यांनी आसामबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कडू म्हणाले होते की, “महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात. या श्वानांचा व्यापार होईल. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली.” असे बोलले होते, या वक्तव्याचा आसामच्या विधानसभेत विरोधी आमदारांनी गोंधळ घातला असून बच्चू कडू यांच्या अटकेची मागणी देखील केली आहे.

दरम्यान, कडू यांच्या या वक्तव्यामुळे आसामच्या विधानसभेतील वातावरण तापलं आहे. आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कडू यांच्या वक्तव्यावरून मोठा गोंधळ झाला. यामुळे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना त्यांचं भाषणदेखील थांबवावं लागलं होतं. काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. “आसामबद्दल इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सरकार यावर शांत का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, विरोधी पक्षातील आमदारांनी कडू यांना अटक करावी, अशी मागणी देखील केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: