Saturday, December 21, 2024
Homeराज्यविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवख्या इच्छुकांची मांदियाळी; स्थानिक कार्यकर्त्याना संधी मिळणार की आयात...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवख्या इच्छुकांची मांदियाळी; स्थानिक कार्यकर्त्याना संधी मिळणार की आयात केलेल्यांना…

बिलोली – रत्नाकर जाधव

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहे. परंतु आजची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आजी माजी अंमदारांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी ही कंबर कसली आहे. मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून सर्वात जास्त काळ अंतापुरकर पिता पुत्रांनी नेतृत्व केले तर ऐकवेळा सुभाष साबणे यांनी नेतृत्व केलं.

परंतु या आरक्षित मतदारसंघात प्रस्थापित नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्याना नेतृत्व करण्याची संधी देण्यापेक्षा त्यांना “ जय हो ” म्हणण्यापूरते ठेवले होते.परंतु आरक्षणाच्या शेवटच्या काळात आत्ता स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारीच्या मागणीची तयारी सुरू केली आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिकांना उमेदवारी मिळते की आयातांना हे पहावे लागेल.

विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर

आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी भावूक गर्दी सुरू झाली आहे.राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची प्रचंड गर्दी असणार आहे. राष्ट्रीय पक्ष असलेले भाजपा व काँग्रेस हे दोन सोडले तर राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात झालेल्या फुटीमुळे विधानसभा निवडणुकीत रंगत येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगने देगलूर विधानसभा या अनुसूचित जातीसाठी २००९ पासून आरक्षित मतदारसंघात आजतागायत काँग्रेसने दोनदा तर शिवसेनेने एकदा प्रतिनिधित्व केले आहे.यात २०१४ चा अपवाद वगळता दोन निवडणुकीत अंतापुरकर पितापुत्रांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. वेब २०१४ साली शिवसेनेचे सुभाष साबने यांनी नेतृत्व केले.परंतु गेल्या पाच वर्षांचा राज्यातील राजकारणाचा स्तर पहिला तर या आगामी विधानसभा निवडणुकीत एकंदरीत विचार केला तर या मतदारसंघात भाजपाकडून सुभाष साबणे, अविनाश घाटे या मुखेडकरांच्या नावाची चर्चा आहेत तर सगरोळीचे भूमिपुत्र असलेले व प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले सनदी अधिकारी मधू गिरगावकर व एकेकाळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू राहिलेले परंतु आत्ता शिवसेना (शिंदे गट) मध्ये गेलेले नांदेड मनपाचे माजी नगरसेवक मंगेश कदम यांची नावे चर्चेत आहेत.

विशेष म्हणजे अंतापुरकर जर सोडले तर बाकी सर्व मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत.देगलूर मतदारसंघाचा कदाचित हा अनुसूचित जातीसाठीचा आरक्षित मतदारसंघाचा हा शेवटचा कार्यकाळ असेल या उद्देशाने आता स्थानिकच्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जिल्ह्यातील दलित चळवळीतील प्रस्थ नेते सुरेश गायकवाड,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे,भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा देगलूरचे माजी नगरसेवक शत्रुघन वाघमारे, शहापूर गटाचे माजी जि.प. सदस्य निवृत्ती कांबळे,सगरोळी गटाच्या माजी जि.प.सदस्या सौ.प्रा.कविता सोनकांबळे यांचे यजमान गंगाधर सोनकांबळे,देगलूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उत्तम कांबळे ही नावे ही चर्चेत आहेत.

त्यामुळे जर युती किंवा आघाडी झाली नाही तर चर्चेतील नाराज हे कोणत्याही पक्षाकडून अथवा पक्षातील गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील असा अंदाज आहे.देगलूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्या पासून दोनच समाजाला संधी नेत्यांनी व मतदारांनी दिली आहे त्यासाठी आता मतदाधिक्य असलेल्या दुसऱ्या समाजाला नेतृत्वाची संधी द्यावी मग ती स्त्रीच का असेना?अशी मागणीनी केली जात आहे.आणि जर पक्षश्रेष्ठींनी यावेळी महिलेला संधी दिली तर माजी जि.प.सदस्य प्रा.सौ.कविता सोनकांबळे यांची वर्णी लागू शकते असा कयास बांधला जात आहे.त्यामुळे आगामी विधनसभेचौ देगलूर मतदारसंघात रंगत येण्याची सजक्यता आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: