सांगली – ज्योती मोरे.
आमदार जयंत पाटील यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक आठ मधील सैनिक नगर मध्ये अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिलाय सदर निधीतून प्रभाग क्रमांक आठ मधील सैनिक नगरातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणास आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी नगरसेवक विष्णू माने आदींसह स्थानिक नागरिकांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी दत्ता क्षीरसागर,सावंता माळी, रावसाहेब पाटील, आनंद सावंत, अमित चव्हाण, गणेश माने, बापू भोसले, पांडुरंग भोसले, रवी कोळी, सुनीता जाधव, सुरेश मोरे,बाळू माने, काकासाहेब जाधव,बबन दळवी, स्वच्छता निरीक्षक गणेश धोत्रे, आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते.