Sunday, November 17, 2024
Homeमनोरंजनएशियन फाऊंडेशन २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला...

एशियन फाऊंडेशन २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला…

गणेश तळेकर

दिनांक: १७ – १ – २०२४ , ” जेत्राब ” दिग्दर्शक तानाजी घाडगे ,सुहास पणशीकर , कल्पना जगताप, शिवाली परब ,ओम बुधकर, रोहित माने यांचा चित्रपट आज तरुण प्रेषक, ज्येष्ठ प्रेषक यांनी हा चित्रपट बघितला, त्यांना भावला आणि खूप खूप अभिनंदन केले.

एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ केला, या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (MFSCDC) अविनाश ढाकणे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्युरी मेंबर स्मिता तांबे, ज्ञानेश झोटिंग आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुहास पणशीकर याच्या ” जेत्राब ” ला आज प्रेक्षकांची मोठी हजेरी लावली होती. या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा तसेच कलेची वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देणे हे,

यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी घेतला ,असे आवाहन फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी केले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

‘आंद्रागोजी’ चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली.१८जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात आले , या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळाली.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: