भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आशिया चषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अक्षर पटेलचा संघात समावेश केला आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. सध्या त्याची बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून काळजी घेतली जात आहे.
त्याच्या जागी आलेला अक्षर पटेल आधीच राखीव खेळाडू म्हणून संघात होता आणि लवकरच दुबईत संघात सामील होणार आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव करून भारतीय संघ आशिया चषकाच्या सुपर-4मध्ये पोहोचला आहे. तेथे त्यांना श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. जर पाकिस्तानने हाँगकाँगला हरवले तर सुपर-4 मध्ये भारताविरुद्ध खेळेल.
आशिया कपमध्ये रवींद्र जडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध दोन षटकात 11 धावा दिल्या आणि 29 चेंडूत 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने हार्दिक पांड्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले आणि विजयाच्या उंबरठ्यावर नेले. या सामन्यात त्याने एक महत्त्वाचा झेलही घेतला. त्याचवेळी हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जडेजाने चार षटकात केवळ १५ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. याशिवाय त्याने शानदार धावबादही केले.
आशिया कपसाठी भारताचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.