Sunday, January 5, 2025
Homeराजकीयअशोकराव चव्हाण यांचा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेना धन्यवाद..!

अशोकराव चव्हाण यांचा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेना धन्यवाद..!

नांदेड – महेंद्र गायकवाड

मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे डबे अत्यंत खराब असल्याने नवीन डबे देण्यात यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मांडली होती. त्यानुसार १३ फेब्रुवारीपासून देवगिरी एक्स्प्रेसला सर्व सुविधायुक्त नवे एलएचबी डब्बे जोडणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फोन करून अशोकराव चव्हाण यांना कळविले आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून, त्यासाठी मी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे हा विभाग दक्षिण मध्यतून वगळून मध्य रेल्वेला जोडण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत देखील निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे.असे अशोकराव चव्हाण यांनी म्हंटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: