नागपूर – शरद नागदेवे
मानसाच्या जिवनात वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.वन संरक्षणासाठी नागरिकांच्या सोबतच अधिकारी व कर्मचारी बांधवांची महत्वाची भुमिका असते स्व.उत्तमराव पाटील प्रधान मुख्य वन संरक्षक व वन विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी अधिकारी होते.
त्यांचा स्मृती ला अभिवादन करण्यासाठी भरिव कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला दरवर्षी वनराई फाऊंडेशन, नागपूर वनरक्षक व महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने यांना रोख २१,०००( हजार रुपये ) सन्मान चिन्ह,शॉल व श्रीफळ असे स्वरूप असलेला “स्व उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार ” देऊन गौरविण्यात येते.
२०२४ ला “स्व उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कारासाठी अमरावती येथील साहाय्य वनसंरक्षक( निवृत्त) अशोक कवीटकर यांची निवड करण्यात आली आहे. श्री.अशोक कविटकर १९८८ मध्ये वनपाल म्हणून रूजू झाले.२०२० साली साहाय्यक वनसंरक्षक पदावरून म्हणून सेवानिवृत्त झाले.
आतापर्यंत सर्वश्री रमेश मारूळकर ,विजय पीजंरकर ,महेश तिवारी, सुरेश राहांगडाले, किशोर रिठे,मनोहर सप्रे, सैय्यद सलीम अहमद,राखी चौव्हान,प्रा सुरेश चोपने, इत्यादी मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दिनांक २१ मार्च २०२४ रोजी स्व.उत्तमराव पाटील यांच्या स्मूतिदिनानिमीत्त प्रदान करण्यात येणार आहे..