हेमंत जाधव
नामदेव आणि ज्ञानदेव हे वारकर्यांचे जीव की प्राण. सांप्रदायाचे आधारस्तंभ, मराठी मुलखातील भक्ती परंपरेतील तेजस्वी हिरे. माऊलींनी अव्दैयानंद वैभव जगासमोर आणले, गीतेची टिका करुन परब्रम्ह सर्वांसाठी मुक्त केले. कैवल्याच सात्विक चांदण पडल, संताची मांदीयाळी गोळा केली आणि भवसागर पार करण्याची सोपी वाट केली. तुकाम्हणे केली सोपी पायवाट। उतरावया भवसागर रे।
तर नामदेवांनी ही भक्तीधारा पंजाब पर्यंत पोहचवली. जगात ज्ञानदिप लावला. पंजाबात घुमान गावी त्यांनी कार्य केले. नामदेवाची वाणी गुरुग्रंथ साहीब मध्ये अंर्तभुत केली गेली इतके श्रेष्ठ कार्य त्यांनी केले. नामदेवांचे सर्व अभंग, गौळणी खुप करुणामय आणि मधुर आहेत. त्यांची बाळक्रिडेचे अभंग खुप सुंदर आहेत.
नामदेवांचा एकच मंत्र होता
“बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले ।
प्रेम सर्वांगाचे ठायी, वाचे विठ्ठल रखुमाई ॥१॥
नाचु किर्तनाचे रंगी ज्ञान दिप लावू जगी ॥२॥
परेहूनी परते घर, तेथे राहू निरंतर ॥३॥
सर्वसत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता ॥४॥”
संत नामदेवांच्या पवीत्र स्मृतीस कोटी कोटी वंदन