Sunday, December 22, 2024
Homeराज्यलोकसभेची उमेदवारी जाहीर होताच खा.चिखलीकरांनी घेतली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट...

लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच खा.चिखलीकरांनी घेतली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड लोकसभा मतदारसंघांचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पक्षाच्यावतीने लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने नांदेड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण यांची चर्चगेट, मुंबई येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात केली.

यावेळी माजी विधानपरिषद सदस्य अमरनाथ राजुरकर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव देविदास राठोड, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस तथा लोहा निवडणूक प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील बोरगावकर, डॉक्टर संकेत आढाव, ऋषिकेश मोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: