उद्या नितीन कदम यांचे मतदार नोंदणी शिबिर…
अमरावती – संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या संकल्पनेतून उद्या २१ जुलै रोजी ‘ भव्य मतदार नोंदणी अभियान’ कार्य्रमाअंतर्गत सकाळीं १० : ०० ते ०५ : ०० वाजेपर्यंत मतदार नोंदणीचे आयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर, बुध्द विहार, खंडेलवाल लेआऊट, मैत्री विहार कैलास नगर,महादेव खोरी येथे करण्यात आले आहे. या नव नोंदणी करिता रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा, पासपोर्ट छायाचित्रासह ईतर दस्तऐवज आवश्यक असल्याचे संकल्प शेतकरी संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळ येथुन महिती मिळाली आहे.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवयुवकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त युवकांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी संकल्प शेतकरी संघटना प्रयत्नशील असून या कार्यक्रमात सहभाग घेवून मतदार नोंदणी करावी, असे आवाहन नितीन कदम यांनी आज केले.
कदम यांनी मध्यामासोबत बोलतांना ‘ संकल्प शेतकरी संघटना व भारत निवडणूक आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांसह समाजातील दिव्यांग, तृतीयपंथी, वंचित घटक यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्यात येत आहे. शहरी भागात मतदान कमी प्रमाणात होते, त्याचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. १८ ते २९ वयोगटातील युवकांचे मतदार यादीत कमी प्रतिनिधित्व असून ते वाढणे आवश्यक आहे’ असेही कदम म्हणाले.
युवकांनी स्वत:च्या मतदार ओळखपत्राला आधार जोडणी करुन घेण्यासह कुटुंबातील सदस्यांनाही आधार जोडणीसाठी प्रोत्साहित करावे. सुदृढ लोकशाहीसाठी मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करावा. मतदार यादीत आपले नाव नोंदवणे व मतदानात भाग घेणे हे आपले कर्तव्य आहे. महाविद्यालयातील १८ वर्षांच्या पुढील सर्व वयोगटातील युवकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, त्यासाठी विशेष करून शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कदम यांनी यावेळी केले आहे.