Sunday, December 22, 2024
Homeराज्यअरविंदबाबू देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा...

अरविंदबाबू देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा…

नरखेड – अतुल दंढारे

अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथे विज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नोबेल पारितोषिक विजेते थोर भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन देशभर साजरा केला जातो व विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. या अनुषंगाने राज्यस्तरीय इन्फॉर्मेटीव व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उ्दघाटन मुख्य अतिथी प्रा.डॉ. अतुल चरडे, नबीरा महाविद्यालय काटोल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन करण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तरच मानवी जीवन सुकर होईल व जीवसृष्टी सुद्धा जोपासली जाईल असे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचावा व कर्मकांड मुक्त समाज निर्माण व्हावा.

संत गाडगे महाराज महाविद्यालय, हिंगणा, जि. नागपूर येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. राजदीप उताणे हे कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रगतीचे गुणदोष सोप्या भाषेत समजून सांगितले व विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाकरिता वैज्ञानिकरित्या कार्य करण्याचे आवाहन केले. कॉन्ट्रीब्युशन ऑफ इमिनेन्ट सायंटिस्ट इन डेव्हलपमेंट ऑफ सायन्स हा स्पर्धेचा विषय होता. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक अभिरुची व आवड निर्माण व्हावी हा होता. भारताला सी. व्ही. रमण, आर्यभट्ट, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, विक्रम साराभाई यांसारखे अनेक वैज्ञानिक संशोधक लाभले व त्यांनी जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावले. त्यांची माहिती स्पर्धेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी असे विज्ञान दिन आयोजन समितीचे समन्वयक प्रा.डॉ. अविनाश इंगोले यांनी प्रास्ताविकात सांगितले.

स्पर्धेमध्ये नबीरा महाविद्यालय येथील कु. मोनाली धोतरकर या विद्यार्थिनीला प्रथम पारितोषिक मिळाले. द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे कु. वैष्णवी चचाने, अ.दे.म. व कु. अवंतिका रघताते, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांना मिळाले. प्रा. मानसी जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

तसेच प्रा. संपत सिंगडा यांनी सर्वांचे आभार मानले. प्रा.डॉ. मेघा रघुवंशी, प्रा.डॉ. स्मिता गुडदे, प्रा.डॉ. नितीन राऊत, प्रा.डॉ. अंजली घारपुरे, प्रा.डॉ. अमित गद्रे, प्रा. सुरेंद्र सिनकर, प्रा.डॉ. राम डोंगरे, प्रा.डॉ. शैलेश बनसोड, प्रा.डॉ. पितांबर गायकवाड, प्रा. भरत मडावी व सर्व प्राध्यापकांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सहकार्य लाभले. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती नोंदविली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: