नरखेड – अतुल दंढारे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने देण्यात येणारा सत्र 2021- 22 चा विद्यापीठस्तरीय पुरस्कार अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगीला उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाला आहे.
तसेच प्रा.राजेंद्र घोरपडे यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्वोत्तम कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून सत्र २०२१-२२ चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात, पुरस्कार वितरण सोहळा नुकताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झाला. प्र- कुलगुरू डॉ.संजय दुधे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पवार आणि प्रा. राजेंद्र घोरपडे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक राजेंद्र घोरपडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.मनोजकुमार वर्मा व डॉ.नितीन राऊत यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. महाविद्यालयाने कोविड -१९ च्या काळात जनजागृती अभियान अंतर्गत मास्क वाटप, रक्तदान शिबिरे,
स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान जनजागृती रॅली, कोविड लसीकरण शिबिरे, साक्षरता अभियान मोहीम असे विविध उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मदतीने राबविण्यात आले. या उपक्रमांची रातूम नागपूर विद्यापीठाने विशेष दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना बहाल केलेला आहे.
महाविद्यालयाला मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय प्राचार्य डॉ. प्रकाश पवार यांनी व्हीएसपीएम संस्थेचे अध्यक्ष मा. रणजितबाबूजी देशमुख साहेब, संस्थेचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब भोगे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. आशिषबाबू देशमुख, कार्यवाह मा. युवराजजी चालखोर,तथा संस्थेच्या संचालकांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनासाठी विशेष आभार मानले.